रत्नागिरी : दैवज्ञ चषक ( वर्ष ३ रे) दैवज्ञ हितवर्धक समाज व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, दैवज्ञ हॉल, पावर हाऊस, नाचणे रोड, रत्नागिरी येथे दिनांक ०४ व ०५ जानेवारी २०२५ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर स्पर्धा १ पुरुष एकेरी, २ पुरुष दुहेरी, ३ महिला एकेरी, ४ कुमार गट, ५ कुमारी गट ६ किशोर गट व ७ किशोरी गट अश्या सात गटात खेळवली जाणार आहे या वर्षातील हि ६ वी स्पर्धा आहे . जे खेळाडू यावर्षी कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही त्या खेळाडूंनी २०२४-२५ या वर्षाची रजिस्टेशन फी रुपये ५०/- जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी रुपये १५०/- दुहेरीसाठी रुपये २००/- व लहान गटासाठी रुपये १००/- याप्रमाणे येईल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल.
सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका बुधवार दिनांक १ जानेवरी २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात. स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. मागावून कोणतीही तक्रार एकून घेतली जाणार नाही. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
तालुका प्रतिनिधी खालील प्रमाणे आहेत.
१ ) गुहागर – श्री प्रदीप परचुरे ( ९४२३०४८२५० )
२ ) रत्नागिरी – श्री विनायक जोशी ( ८३९०३८७४८३ )
३ ) देवरूख – श्री राहुल भस्मे (९६५७६३७६७८ ), श्री मोहन हजारे ( ९४२२०५३९४३)
४ ) चिपळूण – श्री प्रकाश कानिटकर ( ९४०३५६४७८२ ), श्री दीपक वाटेकर (९९७५५४६६२५ )
५ ) संगमेश्वर – श्री मनमोहन बेंडके ( ९१३०३०६५२५ )
६ ) लांजा – श्री मनोज जाधव ( ७६२०११६७३६ )
७ ) खेड – श्री योगेश आपटे ( ९९५३२२२६३१ )
८ ) राजापूर – श्री मनोज सप्रे ( ९४०३७६८३७६ )
९) दापोली – श्री माधव शेट्ये (९२०९७०९७९२)
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून कॅरम राज्यस्तरीय पंच श्री मंदार दळवी व सागर कुलकर्णी यांची निवड करण्यात आलेली आहे .सदर स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख श्री सचिन बंदरकर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन श्री संतोष भुर्के अध्यक्ष दैवज्ञ हितवर्धक समाज, श्री सुहास वीरकर उपाध्यक्ष दैवज्ञ हितवर्धक समाज, श्री धनेश रायकर सेक्रेटरी दैवज्ञ हितवर्धक समाज, श्री गुरुप्रसाद खेडेकर खजिनदार दैवज्ञ हितवर्धक समाज, श्री संतोष खेडेकर कार्याध्यक्ष दैवज्ञ हितवर्धक समाज, श्री प्रदीप भाटकर अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, श्री सुरेंद्र देसाई उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन श्री सुचय अण्णा रेडीज सल्लागार रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन व श्री मिलिंद साप्ते सचिव रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 28/Dec/2024












