रत्नागिरी : गणपतीपुळेत शहाळी विकणाऱ्या दाम्पत्याचे बेमुदत उपोषण

रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्र किनारी २० वर्षे शहाळी विकणाऱ्या दाम्पत्याचा स्टॉल ग्रामपंचायतीने ऐन हंगामात बंद केल्याच्या निषेधार्थ दाम्पत्याने बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

शरद मयेकर आणि आदीती मयेकर असे शहाळ्याचा व्यवसाय करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. गेली २० वर्षे ते गणपतीपुळे समुद्र किनारी हा व्यवसाय करत आहेत. परंतु गेल्या वर्षीपासून त्यांना ग्रामपंचायतीकडून विनाकारण त्रास दिला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 28/Dec/2024

Gadre1