रत्नागिरी : जिल्हा ग्रंथालयात सोमवारी ग्रंथ प्रदर्शन

रत्नागिरी : उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयात १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कुवारबाव यांच्याद्वारे ३० डिसेंबर २०२४ रोजी ग्रंथ प्रदर्शनाने होणार आहे.

वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्वाचे पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते; परंतु अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील वाचक व विद्यार्थी वर्ग यांना पुन्हा पुस्तकांकडे आकृष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक वाचन, वाचनकौशल्य कार्यशाळा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयाकडून १ ते १५ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. या उपक्रमात स्थानिक वाचकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 28/Dec/2024