खेड रेल्वे स्थानकात महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

खेड : खेड रेल्वे स्टेशन येथे एक धक्कादायक चोरीची घटना घडली आहे. दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी सावंतवाडी-दिवा ट्रेनमध्ये प्रवास करत असताना एका महिला प्रवाशाची सोन्याची बांगडी चोरीस गेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला दापोली येथील रहिवासी असून ती सावंतवाडी दिवा ट्रेनमध्ये खेड रेल्वे स्टेशनवरून चढली होती. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने काही अज्ञात इसमाने तिच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून पळ काढला. या बांगडीची किंमत सुमारे ७५ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या बाबत पीडित महिलेने २६ डिसेंबर रोजी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 28/Dec/2024