चिपळूण : जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी पहिली अनोखी रोबोटिक्स रोबोकॉन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ जानेवारी रोजी एसपीएम इंग्लिश स्कूलमध्ये परशुराम येथे ही स्पर्धा होणार आहे.
रोबोटिक्स पुणे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशिलता, नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्यास वाव मिळावा यासाठी रोबोकॉन ही स्पर्धा होत आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले रोबोट प्रदर्शनात ठेवले जाणार आहेत. या प्रदर्शनास प्रमुख पाहुणे म्हणून आ. शेखर निकम उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी विविध पुरस्कार आणि बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी अभिजीत सहस्त्रबुद्धे यांच्याशी संपर्क साधावा. जिल्हाभरातील शाळांनी या रोबोकॉन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 28/Dec/2024












