लांजा : लांजा-साटवली मार्गावर शुक्रवारी दुपारी खावडी येथे एस. टी. बस व मारुती ओमनी कार यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातात पाचजण जखमी झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
अपघातात आत्माराम पळसमकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा आगाराची लांजा-बापरे एसटी बस (क्र. एम. एच.१४, बी. टी २२८६, चालक विनोद पांडुरंग पाटील) लांजाहून बापरेच्या दिशेने निघाली होती. बस लांजामधून खावडी येथे आली असता, याचदरम्यान खावडीहून लांजाच्या दिशेने जाणारी ओमनी (क्र. एम एच ०४, ए. पी. ९५६६) मध्ये जोरदार धडक बसली.
अपघातग्रस्त ओमनी व्हॅनमधील संतोष शांताराम नामे (३५ वर्षे, रा. खावडी), आत्माराम महादेव पळसमकर (६५ वर्षे, रा. निओशी), प्रदीप राजाराम करंबे (५२ वर्षे, रा. खावडी), शुभांगी संतोष नारकर (५७, वर्षे, रा. मुंबई), ललिता लक्ष्मण तांबे (४०, रा. निओशी) असे एकूण पाचजण जखमी झाले असून जखमींमध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. यात आत्माराम पळसमकर हे गंभीर जखमी झाले. या बाबत अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 28/Dec/2024












