रत्नागिरी : खालगाव जाकादेवी येथील महाआरोग्य-नेत्रतपासणी शिबिराला प्रतिसाद

रत्नागिरी : तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय झडपोली यांच्या संयुक्त विद्यमाने २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत महाआरोग्य आणि नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र विभाग रत्नागिरी केंद्र खालगाव जाकादेवी यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

श्री जाकादेवी देवस्थान रंगमंच येथे हे शिबीर घेण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील पहिल्यांदा मोफत महाआरोग्य शिबिराचा परिसरातील लोकांना लाभ मिळाला. विविध गावांतील वाड्या, आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मोठ्या प्रमाणात तरुण, तरुणी, पुरुष, स्त्रिया लहान मुले, व वयस्कर लोकांनी या शिबिरासाठी गर्दी केली होती. ५३३ लोकांनी प्रत्यक्ष नोंद करून लाभ घेतला. तसेच ३४३ रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले.

मोतिबिंदू च्या १४३ रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर मुतखडा, मूळव्याध, हर्निया, अपेंडीस, हायड्रोसील, वेगवेगळ्या आजारांवर तसेच नेत्र तपासणी, शुगर तपासणी, रक्तदाब, जनरल तपासणी या मोफत तपासण्या करून मोफत गोळ्या औषधे व नेत्र तपासणी करून चष्मे देण्यात आले.

ज्या रुग्णांची ऑपरेशनची गरज आहे, त्यांनाही संस्थेच्या हॉस्पिटलमधून मोफत ऑपरेशन करून देणार आहेत. या शिबिरासाठी मुंबई, ठाणे, झडपोली येथून तज्ज्ञ डॉक्टर विजय पगारे, व त्यांच्या सर्व सहकारी नर्सेस यांनी चांगल्या प्रकारे सेवा दिली.

या शिबिरासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था या संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये विष्णू माणिक गोताड श्री जाकादेवी देवस्थान अध्यक्ष- खालगाव, सूर्यकांत कृष्णा गोताड- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र वसंत मांडवकर, सचिव केदार चव्हाण, मंदार नैकर, प्रकाश खोल्ये, मनोहर बाळू गोताड रघुनाथ गोताड, प्रकाश गोताड, रवींद्र खोल्ये, विलास धामणे, दीपक सांबरे, शंकर मांडवकर आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या शिबिरासाठी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:23 PM 28/Dec/2024