श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय कसोप येथे कायदेविषयक शिबिर

रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या वतीने कायदेविषयक शिबिर दि. २६/१२/२०२४ रोजी रत्नागिरी येथील श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय कसोप – फणसोप येथे संपन्न झाले.

शिबिराला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी येथील कायदासाथी PLV श्री.पांडुरंग नंदीवाले, वकील व कायदा तज्ञ ॲड. गौरव शेलार, कसोप – फणसोप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा राजशिर्के तसेच शिक्षक व शिक्षिका, पाचवी ते दहावीचे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

शिबिरामध्ये श्री. नंदीवाले यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये मुलांना असलेले हक्क, अनाथ बालकांसाठी योजना, बाल गुन्हेगारी, हेल्पलाइन नंबर, टोल फ्री नंबर अशा विविध विषयांवरती मुलांना मार्गदर्शन केले.

तसेच ॲड. गौरव शेलार यांनी लैगिक अपराधांपासून बाल संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्सो कायदा), मुलांवर होणारे लैंगिक हल्ले, शिक्षा यांविषयी मार्गदर्शन केले.

Radhakrushna patapedhi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 28-12-2024