रामपूर : तालुक्यातील मार्गताम्हाणे गावचे सुपुत्र नीलेश चव्हाण यांच्या स्कॉन प्रोजेक्टस पुणे या बांधकाम कंपनीला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणेतर्फे वेल बेस्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२४ अंतर्गत इंडस्ट्रियल प्रोजेक्ट २०२४ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल स्कॉन प्रोजेक्टस कंपनीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कामाची गती, सुरक्षा आणि दर्जा ही त्रिसूत्री वापरुन चव्हाण यांनी १५ वर्षात ३५० औद्योगिक बांधकाम प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा इत्यादी राज्यात पूर्ण केले आहेत. कंपनीचा सामाजिक उपक्रमात देखील सिंहाचा वाटा आहे. आजपर्यंत कंपनीने अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळविले आहेत.
यामध्ये ४९ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, वैयक्तिक २२ पुरस्कार आणि त्यांच्या कंपनीला २७ पुरस्कार मिळाले आहेत. आता आणखी एका पुरस्काराची यामध्ये भर पडली आहे. यामुळे या कंपनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 28/Dec/2024














