सरते वर्ष हे सर्वांत उष्ण वर्ष

नवी दिल्ली : वैश्विक तापमानवाढीमुळे सृष्टीचा तोल ढळत चालला असतानाच उष्णतेची तीव्रताही वाढल्याचे दिसते. सरत्या वर्षात (२०२४) निसर्गाच्या लहरी वागण्यामुळे उष्ण दिवसांमध्ये सरासरी ४१ ने वाढ झाल्याचे दिसून येते असे युरोपीय हवामान संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

सरते वर्ष हे सर्वांत उष्ण वर्ष ठरणार असून औद्योगिकपूर्व पातळीशी तुलना केली असता वैश्विक तापमानामध्ये सरासरी १.५ अंशांची वाढ झाल्याचे दिसून येते. हवामान संशोधकांच्या दोन गटाने एक वार्षिक आढावा अहवाल प्रसिद्ध केला असून या अभ्यास गटामध्ये ‘वर्ल्ड वेदर अॅट्रीब्युशन’ (डब्लूडब्लूए) आणि ‘क्लायमेट सेंट्रल’ या संस्थांचे संशोधक सहभागी झाले होते. छोट्या बेटांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसला असून येथील लोकांना १३० पेक्षा अधिक उष्णतेच्या दिवसांचा सामना करावा लागत असल्याचे ताज्या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. साधारणपणे २०२४ मध्ये तीव्र हवामान बदलाच्या २१९ घटना घडल्या असून त्यातील २९ घटनांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या हवामान बदलामुळे जगभरात जवळपास ३ हजार ७० लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.

.. तर अतिवृष्टी शक्य
सुदान, नायजेरिया, नायजर, कॅमेरून आणि चाड या देशांना महापुराचा फटका बसला असून यामध्ये दोन हजारपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. वैश्विक तापमानात आणखी दोन अंशांनी वाढ झाली तर अनेक भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते असेही बोलले जाते. साधारणपणे २०४० ते २०५० पर्यंत अशा प्रकारचे बदल अपेक्षित असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढले
वैश्विक तापमानात आता सातत्याने वाढ होणार असून जगाने उष्णकाळामध्ये प्रवेश केला आहे. सध्या वैश्विक तापमानामध्ये १.३ अंश सेल्सिअसचा वाढ आधीच झाली असून हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढल्याने हा परिणाम पाहायला मिळत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेनचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोचले आहे.

आहोत. पारंपरिक इंधनाचा ज्वलनामुळे नेमके किती नुकसान होते आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. यंदा जे परिणाम दिसले त्यापेक्षा आणखी भयंकर परिणाम येत्या काळामध्ये पाहायला मिळतील. आपण सर्वाधिक धोकादायक काळामध्ये जगत वापर आहोत पारंपरिक इंधनाचा वापर रोखल्यास परिस्थिती बदलू शकते – फ्रेडरिक ओट्टो, प्रमुख संशोधक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:30 PM 28/Dec/2024