रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय निवासी शिबीर केळ्ये गोडबोले हायस्कूल येथे सुरू आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून राष्ट्रीय सेवा योजना विभागाची शिबीरे ही स्वयंसेवक तसेच समाजाला पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी आहेत, असे सांगितले. समाजात जाऊन समाज समजून घेण्यासाठी समाजातील समस्या जाणून घेण्यासाठी शिबीरे स्वयंसेवकांसाठी उपयुक्त ठरतील. नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम व कार्यपद्धती बदलत आहे, विद्यार्थ्यांनी संधीचा फायदा करून घेतला पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 30/Dec/2024














