चिपळूणात हाफ मॅरेथॉन स्पर्धेत दिला प्लास्टिक मुक्तीचा संदेश

चिपळूण : येथील संघर्ष कीडा मंडळाने आयोजित केलेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सारेच उतरले आणि चिपळूणवासीयांनी एक स्पर्धा यशस्वी करून दाखवली आणि प्लास्टिक मुक्ती व कचरा मुक्तीसाठीचा एक चांगला संदेश जगभर पोहोचवता ही स्पर्धा चिपळूणवासीयांच्या सहकार्याने यशस्वी झाली.

स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे नियोजित वेळेत ही स्पर्धा सुरू झाली. सकाळी साडेसहा वाजता २१ किमी गटातील धावपटूंना माजी खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू अशोकराव शिंदे. पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, माजी सभापती पूजा निकम आदींनी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पुढील गटातील धावपटू स्पर्धेत उतरले. साडेआठ वाजता शालेय गटातील सुमारे ८०० स्पर्धक चिपळूण शहरातून धावले आणि ही स्पर्धा खऱ्या यशस्वीपणे पार पडली.

संघर्ष क्रीडा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली भाऊ काटदरे, अध्यक्ष सचिन कदम, नयन साडविकर, भाऊ पवार, मुन्ना कदम, प्रदीप पवार, रवींद्र लवेकर, प्रसाद आलेकर, प्रसाद खातू आणि त्यांच्या सहकार्यांनी उत्तम नियोजन केले होते. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत चिपळूण शहर ते कालुस्तेपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. नियोजित वेळेत ही स्पर्धा सुरू झाली आणि नियोजित वेळेत पार पाडली.

आयपीएल स्पर्धेचे अँकरिंग करणारी अभिनेत्री ऐश्वर्या नागेश हिचे सूत्रसंचालन, कालभैरव डोल-ताशा पथकाचे ढोल वादन, जागोजागी लावलेले स्क्रीन, शहरात उभारलेल्या स्वागत कमानी यामुळे खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळाले.

Ratnagiri Khabardar add image

स्पर्धकांना प्लास्टिक रिसायकल करून देण्यात आलेले टी-शर्ट लक्ष्यवेधी ठरले. खुल्या गटातील स्पर्धेत चिपळूणवासीय मोठ्या संख्येने उतरले होते, डॉक्टरांची संख्या अधिक होती. गुहागर, दापोली इथूनही स्पर्धक आले होते. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 30/Dec/2024