रत्नागिरी : कापडगाव येथे कंटेनर उलटून अपघात

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पाली येथील कापडगाव येथे कंटेनर उलटून अपघात झाला. अपघाताची ही घटना मंगळवार ११.४५ वा. सुमारास घडली असून त्यात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिलीप कुमार (२६, रा. उत्तरप्रदेश) असे कंटेनर चालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी तो आपल्या ताब्यातील कंटेनर (एमएच ०३-सी.व्ही. ५०९२) घेउन भरधाव वेगाने जात होता. तो पाली येथील कापडगाव येथे आला असता त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि तो उलटून हा अपघात झाला. कंटेनर उलटल्यामुळे चालक दिलीप कुमार कंटेनरच्या केबीनमध्ये काही काळ अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला केबीनमधून बाहेर काढून त्याला जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी कंटेनर बाजुला करत तेथील वाहतूक सुरळीत केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 01/Jan/2025