पावस : रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे गुळेकरवाडी येथील समीर रघुनाथ गुळेकर व त्याची आई यांचे अपघाती निधन झाले. त्यांची पत्नी व दोन मुलांचा खर्च भागवण्याकरिता कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे या कुटुंबाला पंतप्रधान जीवनविमा योजना यामधून दोन लाख रुपये व गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यामधून दोन लाख, अशी चार लाखांची मदत देण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी मावळंगे वरची गुळेकरवाडी येथील समीर रघुनाथ गुळेकर व त्यांच्या आईचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, वडील अशा कुटुंबाचा सांभाळ करणे कठीण झाले होते. त्यांना यातून सावरण्यासाठी आर्थिक हातभार म्हणून तत्काळ संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक लाखाची मदत मिळवून देण्यात आली. भाजपकडून तालुकाध्यक्ष संजोग दळी यांनी या कुटुंबाला दहा हजारांची मदत केली होती. कुसुमताई सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नाना शिंदे यांनी पतसंस्थेकडून दहा हजारांची मदत केली. यानंतर सामाजिक कार्यकर्ते अनिल बिर्जे यांनी प्रत्यक्ष या कुटुंबीयांना भेटून त्यांच्या वाडीतील अनेक जणांचे सहकार्य घेऊन कागदपत्रे जमवण्यास सुरुवात केली.
ही कागदपत्रे जमवत असताना पावस पोलिस दूरक्षेत्र येथील पोलिस प्रकाश झोरे, बैंक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी, मावळंगेचे तलाठी यांच्या सहकार्यामुळे, भाजपचे तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, प्रकाश गुळेकर, शेखर गोगटे यांच्या पाठपुराव्यामुळे पंतप्रधान जीवनविमा योजनेंतर्गत अपघात विमा कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दोन लाख रुपये व स्व. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या मध्यमातून दोन लाख रुपये, असे चार लाख रुपये कुटुंबीयांना मिळवून दिल्याचे बिर्जे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 09/Jan/2025












