रत्नागिरी : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. गुरुवारी सर्व ग्रामपंचायती एक दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना सरपंच संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.
गेले काही दिवस राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा विषय गाजत आहे. याबाबत विरोधकांनी सत्ताधार्यांना पेचात पकडले आहे. याप्रकरणी चौकशी समितीही नेमली गेली आहे. गेले महिनाभर राज्यभर या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातही सर्व सरपंचांनी एकत्र येत गुरुवारी एक दिवस ग्रामपंचायत बंद ठेवली. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांना याबाबत रत्नागिरी तालुका सरपंच संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भैया भोंगले, उपाध्यक्ष अण्णा पाटील, कैलास कांबळे, गगन पाटील, आकांक्षा कीर, प्रीती भाटकर, तन्वी कोकजे, वेदिका बोरकर, गौतम सावंत, जितेंद्र तारवे, संजय सकपाळ आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 10/Jan/2025












