चिपळूण : वाशिष्ठी उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रशांत यादव यांनी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात सर्व स्तरातील गरजवंतांना रोजगारासोबतच त्यांच्या शेती व्यवसायाला चालना देण्याचे प्रामाणिक कार्य केले. विधानसभा निवडणुकीत अल्पमतांनी त्यांचा झालेला पराभव हा पराभव नसून आमचा विजयच आहे. प्रशांत यादव शांत, संयमी, मनमिळाऊ असल्यामुळे ते आपल्या कार्यातूनच कमी वेळेत लोकांना आपलेसे करणारे नेतृत्व ठरले आहेत. येथे शिवसैनिकांनादेखील प्रशांत यादव यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने बळ मिळाले आहे. अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे संपर्कप्रमुख उद्योजक सुरेश कदम यांनी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस उद्योजक प्रशांत यादव यांच्या कार्याविषयी कौतुक केले.
प्रशांत यादव यांचा वाढदिवस चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या चिपळूण आणि मुंबई स्थित पदाधिकाऱ्यांनी शहरातील हॉटेल अभिरुची सभागृहात रविवारी उत्साहात साजरा केला. केक कापून यादव यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी सुरेश कदम बोलत होते. राजकारणामध्ये एक आदर्श व्यक्ती, मित्र म्हणून प्रशांत यादव यांचे काम उल्लेखनीय आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळून ग्राऊंड पातळीपर्यंत ते लोकांच्या सुख दुःखात सहभागी होतात ही बाब कौतुकास्पद आहे, असे सुरेश कदम म्हणाले.
प्रशांत यादव यांची राजकीय वाटचाल गौरवास्पद आहे. ते राजकारणात एक दिवस उंच शिखर गाठणार असून त्यांची आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत. शिवसैनिक देखील यापुढे त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून सदैव काम करतील, प्रशांत यादव यांनी शिवसेनेसोबत जोडलेले नाते यापुढे असेच राहो अशा शब्दात शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन खरे यांनी वाढदिवसानिमित्त यादव यांना शुभेच्छा दिल्या. विनोद झगडे यांनीही आपल्या भाषणातून प्रशांत यादव यांच्या कार्याचा उल्लेख करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना संगमेश्वर संपर्कप्रमुख राजेश शेलार, संदीप सावंत, चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक मनोज शिंदे, संजय रेडिज, शिवसेना चिपळूण संपर्क प्रमुख शांताराम चव्हाण, तालुका संघटक अशोक नलावडे, संगमेश्वर तालुका संपर्क सचिव प्रकाश दुधम, चिपळूण युवासेना तालुका प्रमुख उमेश खताते, युवा सेना शहर प्रमुख पार्थ जागुष्टे, आदित्य चाळके, चिपळूण महिला तालुकाप्रमुख मानसी भोसले, वंदना शिंदे, प्रशांत मुळे, शाम निर्मल, सूर्यकांत खताते, गंगाराम सांगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 10/Jan/2025














