हसण्यामुळे मेंदू बनतो सक्रिय…

रत्नागिरी : मुंबईतील लाफ्टर योगा कलय आंदोलनाचे प्रणेते डॉ. मदन कटारिया यांनी १० जानेवारी १९९५ रोजी सर्वप्रथम मुंबईमध्ये हास्य योग सुरू केला. त्यानंतर १९९८ मध्ये विश्व हास्य दिन सुरू झाला. त्यामुळे भारतात हा दिवस हास्य दिन म्हणून साजरा केला जातो, यानिमित्ताने हसण्याचे महत्त्व पटवून दिले जाते, काही दिवसांपूर्वी इन्स्टावर मजेशीर व्हिडीओ आला होता, परदेशातील चित्र होते. रेल्वेमध्ये प्रवासी असतात. महिला, पुरुष, तरुण-तरुणी, मुले असे सर्वजण शांत बसलेले असताङ, सर्वांचे चेहरे धीरगंभीर प्रत्येकाच्या डोक्यात ‘टेन्शन’, शेजारीच एकजण रेल्वेमधील बारला चिकटून उभा, त्याच्या हातात पुस्तक आणि अचानक तो हसू लागतो. पुस्तकामध्ये त्याला काय दिसते माहीत नाही, पण तो मोठमोठ्याने हसु लागतो. तो अशा पद्धतीने हसू लागतो, की रेल्वेत बसलेला प्रत्येकजण त्याच्याकडे पाहून हसू लागतो. बघता बघता हास्याचा संसर्ग रेल्वेभर पसरतो आणि आपणही व्हिडीओ बघता, बघता दुःख, ताण विसरून हास्याचा भाग होऊन जातो.

सध्या जगामध्ये डिप्रेशन आजार पहिल्या क्रमांकावर आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणाव. शोधायला गेले, तर त्याला असंख्य कारणे. ती काही आपण तातडीने दूर करू शकत नाही, पण त्यावर तातडीचा जालीम उपाय म्हणजे ‘हसणे’

हसणे अन् विचार वेगवेगळे
ध्यानाचे प्रयोग करणारे ओशो यांनी हसण्याचा एक ध्यान सांगितला. ते म्हणतात, विचार आणि हसणे हे एकाचवेळी राहू शकत नाही. जर तुम्ही मनमोकळेपणाने हसत राहिला, तर विचार करणे थांबून जाते. जर तुम्ही विचार करीत असाल, तर तुम्हाला हसता येत नाही. ‘हसणे’ हा ताणावर सर्वोत्तम उपाय.

लाफिंग बुद्धाज्
आपल्याकडच्या बुद्धाच्या प्रतिमा आणि जपानमधल्या प्रतिमा या वेगळ्या आहेत. जपानमध्ये पोट मोठे असणारा आणि हसणारा बुद्ध दाखवला आहे. याचे कारण माणजे तुम्ही जितके हसाल, वितका श्वास तुमच्या पोटापर्यंत जातो आणि ऑक्सिजनचा पुरवठा शरीरभर होतो. जपानमधला ‘होतेई’ हा हसरा बुद्ध होता. तो काहीही बोलायचा नाही. फक्त पोट धरून हसायचा, लोकही त्याच्याबरोबर हसायचे आणि बघता बघता त्याचे हसणे संपूर्ण गावभर पसरायचे, लोक आनंदी होऊन घरी परतायचे, यालाच नंतर जपानमध्ये ‘झेन चे हसणे हे नाव दिले.

कोरोना आणि हास्य
कोरोनाचा काळ हा सर्वांसाठी तग धरून दुःखद कोरोनामध्ये राहण्याचे कारण हे टीव्हीवरील हास्य मालिका. त्या अनेकांनी बघितल्या. बाहेरच्या जगात कितीही दुःख असेना, मात्र काहीजण या मालिका बघून आनंदात दिवस काढत होते. मुलाखतीमध्ये अनेकांकडून हास्य मालिकांना धन्यवाद देण्यात आले.

हसण्यामुळे मेंदू बनतो सक्रिय…
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हसणे ही मानवाला मिळालेली अद्भुत देणगी. आपण जेव्हा हसतो तेव्हा शरीरात एन्डॉर्फिन नावाचे आनंद निर्माण करणारे हार्मोन निर्माण होते. यामुळे आपल्याला आनंद व समाधान लाभते. हसणे संसर्गजन्य असते. कोणाला रडताना पाहून आपल्याला रडू येत नाही, पण चार लोक हसत असले तर आपल्यालाही हसू येते. म्हणूनच लाफ्टर क्लब सुरू झाले आणि बरेच लोक त्यात सामील होतात. हसणारी माणसे सगळ्यांनाच आवडतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 11/Jan/2025