रत्नागिरी : जिल्हास्तरीय तांत्रिक मॉडेल प्रदर्शनात सह्याद्री आयटीआयच्या मॉडेलची निवड

सावर्डे : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय तांत्रिक मॉडेल प्रदर्शनामध्ये रत्नागिरी जिल्हातील शासकीय व अशासकीय अशा एकूण दहा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी सहभाग घेऊन ३९ तांत्रिक मॉडेलची मांडणी केली. या प्रदर्शनात सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने यश मिळविले आहे.

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मधून आर.ए.सी ट्रेडचे मिनी डीसी एअर कुलर व मेकॅनिक डिझेल ट्रेडचे व्हील बेरो या दोन मॉडेलची मांडणी करण्यात आली होती. त्यापैकी मेकॅनिक डिझेल ट्रेडचे व्हील बेरो या मॉडेलची जिल्हातील दहा सर्वोत्कृष्ट तांत्रिक मॉडेलमध्ये निवड झाली आहे. त्याबद्दल मॉडेल तयार करणारे प्रशिक्षणार्थी तसेच मार्गदर्शक मेकॅनिक डिझेल ट्रेडचे निदेशक प्रथमेश पाटील यांचे अभिनंदन संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, संस्थेचे सर्व पदाधिकारी व व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, चंद्रकांत सुर्वे, सर्व सदस्य तसेच आय.टी. आयचे प्राचार्य उमेश लकेश्री, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 14/Jan/2025

Arihant 2