रत्नागिरीत खवय्यांसाठी ‘कुकडुकू ६५’चे ३३ वे दालन सुरू; भाजप तालुकाध्यक्ष दादा दळी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

चिकन ६५ चे तब्बल ८ ते ९ अनोखे प्रकार एकाच छताखाली; खवय्यांना मिळणार घरबसल्या ऑनलाईन ऑर्डरचीही सुविधा

रत्नागिरी : चिकन प्रेमींसाठी आणि विविध चवींचा आस्वाद घेणाऱ्या रत्नागिरीतील खवय्यांसाठी एक नवी व दर्जेदार मेजवानी उपलब्ध झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या ‘कुकडुकू ६५’ या नामांकित ब्रँडच्या राज्यातील ३३ व्या दालनाचा शुभारंभ रत्नागिरी शहरात उत्साहात करण्यात आला. या नवीन दालनाचे भव्य उद्घाटन भाजप तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य दादा दळी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या नवीन दालनामुळे रत्नागिरीच्या खाद्यविश्वात एका नव्या चवीची भर पडली आहे.

चिकन ६५ चे ८ ते ९ वेगवेगळे स्वादिष्ट प्रकार :

सामान्यतः घरांमध्ये किंवा हॉटेल्समध्ये चिकन ६५ हा एकाच पारंपरिक पद्धतीने तयार केला जातो. मात्र, ‘कुकडुकू ६५’ मध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे येथे चिकन ६५ चे तब्बल ८ ते ९ वेगवेगळे आणि नाविन्यपूर्ण प्रकार खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एकाच पदार्थाची विविध मसाल्यांमधील अफलातून चव आता शहरवासीयांना चाखता येणार असल्याने मांसाहारी खवय्यांमध्ये या दालनाबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Ronic

घरबसल्या ऑनलाईन ऑर्डरची विशेष सुविधा :

या दालनाबाबत माहिती देताना फ्रँचायझीचे संचालक मंदार चव्हाण यांनी सांगितले की, दर्जेदार गुणवत्ता आणि चव ही ‘कुकडुकू ६५’ ची खरी ओळख आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी दालनात प्रत्यक्ष येऊन आस्वाद घेण्यासोबतच घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर मागविण्याची उत्तम सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घरपोच गरमागरम पदार्थांचा आनंद घेता येईल.

उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती :

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी फ्रँचायझी चालक मंदार चव्हाण यांच्यासह संतोष बोरकर, ऋग्वेद दळी, सौरभ चव्हाण आदी मान्यवर, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवर व खवय्यांनी या नाविन्यपूर्ण पदार्थांच्या चवीचा आस्वाद घेत व्यवस्थापनाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.