रत्नागिरी : भारतीय सण आणि निसर्ग यांचे नाते अधिक दृढ करत महिलांनी संक्रांतीनिमित्त होणाऱ्या हळदीकुंकू समारंभात देण्यात येणारे वाण पर्यावरणपूरक बनवले आहे. यंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तूंना पसंती दिली जात आहे. महिलांच्या मागणीनुसारच बाजारपेठेत वाण म्हणून प्लास्टिकच्या साहित्याला फाटा दिल्याचे दिसून येत आहे.
संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन महिला करतात. यानिमित एकमेकींना वाण देण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. आजपर्यंत वाण देण्यासाठी गृहोपयोगी वस्तूंमध्ये स्टील, प्लास्टिकच्या वस्तू खरेदी केल्या जात होत्या. मात्र, या वस्तू प्रमाणे मसालेचे बॉक्स, घरगुती साहित्यासह विविध डिझायनिंग पिशवी, आदींची बुकिंग अनेक महिला ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.
व आगाऊ बुकिंग सुद्धा करण्यात येत आहे. हळदी कुंकवाचेही पॅकिंगचे प्रकार बाजारात आले आहेत. याच्या आवरणाला लहान मणी, लहान आरसे, टिकल्यांची सजावट करून आकर्षक रूपही दिले गेले आहे. १० ते ५० रुपयांपर्यंत याची विक्री केली जात आहे.
काही महिला किराणा मालाचे छोटे पॅक तयार करून त्याचे वाण देत आहेत. अर्धा किलो साखर, कडधान्याचे छोटे पॅकेट, चहापावडरची पाकिटे, हळद पाकिट, साबण आदी घरगुती उपयुक्त सामान वाण म्हणून दिले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 14/Jan/2025
