रत्नागिरी : बेदरकारपणे रिक्षा चालवून इंडिकेटर न देता उजव्या बाजूस वळवली असता पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची धडक बसून अपघात झाला. याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७.४५ वा. सुमारास घडली आहे.
संतोष दिलीप शिवगण (३६) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. तो आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-०८-एक्यू-५०१३) घेऊन कुवारबाव येथून मिरजोळे आदर्शनगरकडे हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या हायवेने जात होता. त्यावेळी अभिषेक इदडप्पा तलवार (२४) हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एडी-५४०६) घेउन रत्नागिरीकडून येत होता. संतोष शिवगण याने आपली रिक्षा इंडिकेटर न देता तसचे हाताने कोणताही इशारा न देता अचानकपणे मिरजोळे आदर्शनगर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस वळवली. त्यामुळे दुचाकीची रिक्षेला पाठीमागून धडक बसून हा अपघात झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:44 15-01-2025
