मंडगणड : निवासी क्षेत्रे आणि कामाच्या ठिकाणापासून सार्वजनिक जागांपर्यंत आग कोठेही लागू शकते. ज्यामुळे अनेकदा जीवितहानी, मालमत्तेचे मोठे नुकसान आणि पर्यावरणाचा नाश यासारखे विनाशकारी परिणाम आपणास दिसून येतात. अग्निसुरक्षेच्या बाबतीत समाजामध्ये जागरुकता असणे खूप गरजेचे व महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रा. संदीप निर्वाण यांनी केले.
येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्यावतीने नुकतेच ‘अग्नीसुरक्षा जनजागृती’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून रसायनशास्त्र विभागाचे प्रा. संदीप निर्वाण हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर उपस्थित होते. यावेळी डॉ. मुकेश कदम, डॉ. सुरज बुलाखे, प्रा. शरिफ काझी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी उपस्थित होते.
सुरुवातीला प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. मुकेश कदम यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करुन कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी डॉ. वाल्मिक परहर यांनीही मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. प्रा. शरिफ काझी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 16/Jan/2025
