खेड : शहरातील एलटीटी इंग्लिश मीडियम शाळेच्या पटांगणावर मकर संक्रांतनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तर्फे माजी नगरध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत तिळगुळ वाटप आणि पतंग उडवण्याचा कार्यक्रम झाला.
सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि पदाधिकारी तसेच मनसेचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, मनविसे जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, मनविसे तालुका उपाध्यक्ष स्वरुप माजलेकर, मिलिंद नांदगावकर, प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, सांस्कृतिक सेना तालुका अध्यक्ष प्रशांत मनोहर, संदीप सासने, स्वप्नील नरळकर, पंकज पुळेकर, केदार वणजू, जयेश गुहागरकर,
अक्षय जांभुळकर, अनंत बर्वे, यश पाटणे, समीर सकपाळ आणि जयमाला पाटणे, मंदार कारेकर, ओंकार वंडकर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनमुराद पतंग उडवण्याचा आनंद लुटला. मनसे पदाधिकारी व कार्यकत्यांनी उपस्थित मुलांना व नागरिकांना तिळगुळ वाटप करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 16/Jan/2025
