चिपळूण : अनुज खरे लिखित ‘साद रानवाटांची’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (ता. १९) इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. लेखक अनुज खरे हे ‘नेचर वॉक आउटडोअर्स’ आणि ‘सफारीज अनलिमिटेड’ या निसर्ग पर्यटन विषयांत काम करणाऱ्या दोन संस्थांचे संचालक आहेत. तसेच ते महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ सदस्य असून पुणे जिल्ह्यात मानद वन्यजीवरक्षक म्हणून सलग सहा वर्षे त्यांनी काम केलेले आहे.
भारतातील जवळपास ५० जंगलांची ओळख त्यांनी या पुस्तकात करून दिली आहे. या सर्व जंगलांमध्ये अनुज खरे यांनी स्वतः भटकंती केली असल्यामुळे तिथल्या बारीक-सारीक गोष्टींसह तिथला निसर्ग, प्राणी याविषयी इत्यंभूत माहिती यात वाचायला मिळेल. जंगलातील या अनुभवांचे ओंकार बापट यांनी शब्दांकन केले आहे. याशिवाय अत्यंत उत्तम छायाचित्रांमुळे जंगलांची एक चुणूकही पाहायला मिळते. कार्यक्रमाला अभिनेते सुयश टिळक, प्रवचनकार आणि व्याख्याते धनंजय चितळे, रत्नागिरीच्या विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई आदी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 16/Jan/2025
