रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्ववत करण्याची मागणी

खेड : कोरोना संकटात मार्च २०२० पासून इतर सर्व गाड्यांप्रमाणे रत्नागिरी- दादर पॅसेंजर बंद करण्यात आली. ७ सप्टेंबर २०२१ पासून रत्नागिरी- दिवा पॅसेंजर सुरू करत प्रवाशांना संभ्रमित करण्यासाठी तिला दादर- रत्नागिरी पॅसेंजरचाच जुना क्रमांक देण्यात आला. कोकणवासियांच्या हक्काच्या पॅसेंजरचा बळी देवून इतर ठिकाणची गाडी सुरू करूनही मध्य रेल्वेने लवकरात लवकर दादर रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करावी, अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.

कोकणातील प्रवाशांची हक्काची दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्याऐवजी दादर-गोरखपूर सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेचा सर्वच स्तरातून निषेधही केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 17/Jan/2025