चिपळूण : शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दि. २३ जानेवारी रोजी चिपळूण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन, ९:३० वा. जिल्हा रुग्णालय व जिल्हा आरोग्य सेना यांच्यावतीने अपरान्त हॉस्पिटल (दुसरा मजला) येथे रक्तदान शिबिर होणार आहे. दुपारी १:३० वा. पर्यंत रक्तदान शिबिर सुरू राहाणार आहे. सकाळी १० वा. पाग विभाग येथे नामफलकाचे अनावरण, १०:३० वा. पाग विभागात बालवाडीमध्ये खाऊ वाटप, ११ वा. खंड विभाग युवा सेनेच्यावतीने केक व रांगोळी स्पर्धा घेण्यात येईल. नगर परिषदेसमोरील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात दुपारी ३:३० वा. हळदी-कुंकू समारंभ होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख विनोद झगडे, शहरप्रमुख शशिकांत मोदी, शिव आरोग्य सेना जिल्हा समन्वयक सुचित्रा खरे, तालुका समन्वयक मानसी भोसले, महिला शहर संघटक वैशाली शिंदे, युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे आदींनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 20/Jan/2025














