रत्नागिरी : रत्नागिरी येथे झालेल्या अखिल मराठा संमेलनात एक महत्वाचा पुरस्कार देण्यात आला. ज्यामध्ये नवलाई उद्योग समूहाला यशस्वी नवं उद्योजक म्हणून पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार मुंबईतील प्रख्यात बिल्डर श्री सुरेश हावरे, श्री राजेन्द्र सावंत, निखिल लाॅजिस्टिकचे एमडी श्री सुरेश कदम, श्री राजेन्द्र घाग आणि मराठा समाज फेडरेशनचे अध्यक्ष श्री सुरेश सुर्वे साहेब यांच्या उपस्थितीत नवलाई उद्योग समूहाने स्वीकारला.
रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या अखिल मराठा संमेलनामध्ये मराठा समाजातील नामवंत उद्योगपती आणि जेष्ठ व्यक्तींनी सहभाग घेतला होता. या पुरस्काराने नवलाई उद्योग समूहाच्या नवीन उद्योजकतेचा गौरव केला गेला. पुरस्कार स्वीकारताना, नवलाई उद्योग समूहाच्या प्रतिनिधींनी या पुरस्कारा बद्दल आभार मानले आणि भविष्यातही नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्याची आश्वासने दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 21-01-2025














