सावर्डे : १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना अत्यावश्यक असते. जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक असतात तसेच जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र प्राप्तीमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर कशा करता येतील. या विषयीचे गोविंदराव निकम ज्युनिअर कॉलेज सावर्डे येथे मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा जात पडताळणी समितीचे प्रशांत दोइंगडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोविंदराव निकम ज्युनिअर कॉलेज सावर्डे येथे कार्यशाळा घेतली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक देखील उपस्थित होते. ग्रामीण भागातील पालकांना जातीचे प्रमाणपत्र काढताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे आजच्या मार्गदर्शनातून उपस्थित पालकांच्या मनातील शंका निरसन झाले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जेष्ठ संचालक शांताराम खानविलकर उपस्थित होते. परिसरातील सर्व ज्युनिअर कॉलेजचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. एकूण ८५ ते ९० विध्यार्थ्यांचे जात पडताळणी अर्ज स्वीकारण्यात आले. विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमास उत्तम प्रतिसाद दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:49 PM 24/Jan/2025














