रत्नागिरी : ‘टीईटी’ परीक्षा निकालाची प्रतीक्षा…

रत्नागिरी : यंदाच्या अभियोग्यता राबविण्यात वर्षी शिक्षक भरती प्रक्रिया येणार आहे. टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेचा निकाल तत्काळ लागल्यास त्यातील पात्र विद्यार्थ्यांना त्या शिक्षक भरतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेच्या निकालांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबरला घेण्यात आली होती. त्याची उत्तरसूची जाहीर झाली. आता परीक्षेला अडीच महिने उलटले आहेत. यानंतरही शिक्षक अभियोग्यता चाचणी ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. परंतु त्यापूर्वी टीईटीचा निकाल आवश्यक आहे. नियोजित वेळापत्रकानुसार निकाल जाहीर झाल्यास उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता, अल्प भाषिक, अल्पसंख्याक संस्थेच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर टीईटीचा निकाल लागावा, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. यंदा तीन वर्षांनंतर टीईटी परीक्षा झाली आहे. त्यानंतर नोकरीसाठी टीएआयटी (पवित्र पोर्टल शिक्षक अभियोग्यता परीक्षा) परीक्षा आहे.

टीईटी परीक्षा आवश्यकच
गेल्या दोन वर्षांपासून टेट परीक्षा झाली नाही. टीईटी परीक्षेच्या निकालानंतरच टेट परीक्षेचे नियोजन केले जाते. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये टेट शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येणार आहे. त्यासाठी टीईटी आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 24/Jan/2025