रत्नागिरी : राज्यातील अनुदानास पात्र शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचीही ‘शाळा’ घेतली जाणार आहे. त्यामुळे शाळेतून अर्ध्यावर सुट्टी मारणे अवघड होणार आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती बायोमेट्रीक किंवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे शिक्षण विभागाने आदेश दिले आहेत. तसेच ही अट पूर्ण न करणाऱ्या शाळा व शिक्षकांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तत्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. तसेच बायोमेट्रिक प्राणाली अवयव चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
गुरू अन् शिष्याचीही हजेरी बायोमेट्रिकवर होईल! शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिकबर घेतली जाणार आहे. ही हजेरी बंधनकारक असून शाळेला सुट्टी मारणाऱ्यांची मात्र मोठी अडचण होणार आहे. बायोमेट्रिकवर चेहरा दाखवा हजेरी लावा, अशाप्रकारे शाळेत आता विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो त्यांना हजेरी लावण्यासाठी प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक मशीन बसविणार आहे. त्याशिवाय हजेरी लागणार नाही.
शाळेत येणारे विद्यार्थी अनेकदा शाळा बुडवून बाहेर जातात. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही असेच वागतात. मात्र, हजेरी शंभर टक्के दाखवली जाते. ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आल्याने अंशतः अनुदान प्राप्त शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यामुळे सुट्टी मारणाऱ्या शिक्षकांना आता पूर्णवेळ शाळेतच राहावे लागणार असल्याचा हा निर्णय आहे. अपडेट द्यावे लागणार असून शाळांमध्ये विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी शिक्षण विभागाकडे संबंधितांना द्यावी लागेल, अपडेट हजेरी दिल्यानंतरच अनुदान मंजुरी, पगार आदींबाबत विचार होणार आहे.
अनेकांची वाढली अडचण
जिल्हयातील अनेक काही शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शाळेत न येता आपले घरगुती काम करीत असतात. अशा शिक्षकांची आता अडचण वाढली आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा सुट्टी घेताना विचार करावा लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:49 PM 27/Jan/2025













