देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्या सहकार्याने किरण सामंतांनी लावला कामांचा धडाका

राजापूर : लांजा राजापूर मतदारसंघात सध्या किरण सामंत यांचाच बोलबाला दिसत आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर प्रत्येक भागातून शिवसेनेत किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेशाचे कार्यक्रम होताना दिसत आहेत. मोठ्या अपेक्षेने येथील जनता किरण सामंत यांच्याकडे पहाताना दिसत आहे. अत्यंत जलद गतीने निर्णय घेण्याच्या पद्धतीमुळे येथील जनता किरण सामंत यांच्यावर प्रभावित झालेली दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने किरण सामंत यांनी आता अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत विविध कामे मंजूर करुन आणली आहेत. यामध्ये उजवा, डावा कालवा वितरित कामे तसेच पुनर्वसन, भूसंपादन कामांचा समावेश आहे.