Abhijeet Dipke : ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचे पोलिसांकडून व्हिडीओ रेकॉर्डिंग


पुणे :
 कॉकरोच जनता पार्टीतर्फे दिल्लीनंतर गुरुवारी (दि. ११) शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी आंदोलन परिसरातील सर्व बाजूंचे व्हिडीओ चित्रिकरण स्वतंत्र व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे केले.

अशा प्रकारे शहरातील विविध पोलिस ठाण्यातील व्हिडीओ कॅमेरे व पोलिस अंमलदार यांना आंदोलनाच्या ठिकाणी एकत्रित बंदोबस्तावर बोलावण्याची ही पहिलीच वेळ होती. सोशल मीडियातून पुढे आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी पोलिसांनीही मोठ्या प्रमाणावर डिजिटल बंदोबस्ताची तयारी केली होती.

पुण्यात स्पर्धा परीक्षा तसेच विविध परीक्षांसाठी अभ्यास करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी येतात. त्यामुळे या तरुण – तरुणींचा या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. त्यादृष्टीने या तरुणाईवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील विविध पोलिस ठाणे, वाहतूक शाखा यांच्याकडील व्हिडीओ कॅमेरामन अशा २१ जणांची या आंदोलनाच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी विशेष नेमणूक करण्यात आली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 12-06-2026

Tata punch