रत्नागिरी : भल्या पहाटे मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामावर मत्स्य व्यवसाय विभागाचा हातोडा पडला. भल्या पहाटेच पोलिसांच्या बंदोबस्तात ही अनधिकृत बांधकामा हटवण्यास सुरुवात केली.
रत्नागिरी सह कोकण किनारपट्टीवरील व्यापारी दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मिरकरवाडा बंदरावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. यामुळे या बंदराचा विस्तारीकरण यामुळे रखडला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या पहिल्याच रत्नागिरी दौऱ्यामध्ये मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश संबंधित मत्स्य व्यवसाय विभागाला दिले.
त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग कामाला लागले. या संदर्भात येथील 319 अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीसा सुद्धा बजावल्या होत्या. मात्र त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस या अनधिकृत बांधकाम धारकांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता ही कारवाई थांबवावी यासाठी सुद्धा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होते.
या पार्श्वभूमी शुक्रवार संध्याकाळपासूनच मत्स्य व्यवसाय विभागाने ही अतिक्रमण हटवण्यासाठी धारकांना आवाहन सुद्धा केलं होते. शनिवारपासून काही जणांनी ह्या बांधकाम स्वतःहून हटवली होती तर सोमवारी सकाळी बांधकाम हटवले जातील हेही निश्चित झालं होते.
त्याप्रमाणे सोमवारी भल्या पहाटे मिरकरवाडा येथील अतिक्रमणांवर मत्स्य विभागाचा हातोडा पडला आहे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. जेसीबी आणि अन्य साहित्य घेऊन हे अतिक्रमण हटवलं जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 27-01-2025














