Maharajswa Samadhan Shibir Ratnagiri: ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानात ६,३५४ नागरिकांनी घेतला लाभ

जिवंत सातबारा, शेतकरी दाखला आणि गावठाण सनदसह विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध

रत्नागिरी: Maharajswa Samadhan Shibir Ratnagiri अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळाला आहे. २२ ते २६ जुलै दरम्यान रत्नागिरी, राजापूर आणि दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरांमध्ये तब्बल ६ हजार ३५४ नागरिकांनी विविध दाखले आणि प्रशासकीय सेवांचा प्रत्यक्ष लाभ घेतला. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत आणि एकाच छताखाली पोहोचवण्याच्या उद्देशाने हे अभियान यशस्वीरीत्या राबवण्यात आले.

Maharajswa Samadhan Shibir Ratnagiri मध्ये दापोली मतदारसंघात सर्वाधिक लाभार्थी

या विशेष अभियानांतर्गत आयोजित शिबिरांमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय लाभार्थ्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:

  • दापोली विधानसभा मतदारसंघ (२६ जुलै २०२६): दापोली क्षेत्रात सर्वाधिक ४,३०८ लाभार्थ्यांनी शिबिराचा फायदा घेतला.
  • रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ (२२ जुलै २०२६): रत्नागिरी क्षेत्रात १,३०८ नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ मिळाला.
  • राजापूर विधानसभा मतदारसंघ (२३ जुलै २०२६): राजापूर क्षेत्रात ७३८ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

जिवंत सातबारा, शेतकरी प्रमाणपत्र आणि विविध सेवांचे वाटप

अभियानादरम्यान ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत सर्वाधिक १ हजार ३८७ शेतकरी व जमीनधारकांना लाभ मिळाला. यामध्ये रत्नागिरीतील ६३८, राजापूरमधील २२७ आणि दापोलीतील ५२२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच महिलांना शेतकरी दर्जा देण्यासाठी राबवलेल्या विशेष उपक्रमात ६१६ महिलांना शेतकरी प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. नागरिकांना ‘स्वामित्वाची सनद’ देण्याच्या योजनेतून २०१ जणांना सनद सुपूर्द करण्यात आली, तर दापोलीत तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ‘स्थानिक क्षेत्र’ घोषणेचा २४२ जणांना फायदा झाला.

याव्यतिरिक्त, इतर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजना मिळून ३ हजार ८५० हून अधिक नागरिकांना विविध दाखले व लाभ हस्तांतरित करण्यात आले. महसूल विभागाकडून गतीने कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या आणि एकाच ठिकाणी सर्व सेवा पुरवण्याच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचला आहे. अशा शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवले जातील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:27 01-08-2026