देवरुख : शहरातील आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय शिवाजी वाहाळकर याने मुंबई येथील खुल्या रांगोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित खुल्या स्पर्धेत अक्षयने ही कामगिरी केली आहे. या रांगोळीत अक्षय ने ‘एकजुटीचा नारा स्वच्छ करूया भारत सारा’ अशा प्रकारचा संदेश त्याने दिला.
या रांगोळीत संत गाडगेबाबा यांचे चित्र व त्यांच्या विचाराप्रमाणे सुरू असलेले स्वच्छता उपक्रम दर्शवले आहेत. याचबरोबर हाताची वज्रमुठ रेखाटताना यामध्ये भारताचा तिरंगा त्याने दाखविला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही हास्य छबी यामध्ये उमटवली आहे.
अक्षय हा अत्यंत चांगला चित्रकार देखील आहे. स्वच्छ भारत संकल्पनेतून साकारलेले ही रांगोळी सर्वांनाच भुरळ पाडणारी ठरली. यामुळेच त्याच्या या रांगोळीने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरून व चित्रकार प्रेमींकडून कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 28/Jan/2025












