चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागातील आकले येथील नदीमध्ये वाळू चोरी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत आकले येथील महिलेने पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार रवींद्र गोपाळ भाताडे (वय ४५), ट्रॅक्टरचालक, डम्पर चालक व जेसीबी चालकाविरूद्ध अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवरेकडून वाहत येणाऱ्या नदीमधील आकले जुना वडेवाडी सडा या ठिकाणी या चार आरोपींच्या वतीने विनापरवाना वाळू उत्खनन केले जात होते. या चौघांनी बेकायदेशीरपणे वाळू चोरीचा प्रयत्न केला. यात जेसीबीचा धक्का लागल्याने पोलिस पाटील सुरेश कदम हे जखमी झाले असते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 28/Jan/2025














