रत्नागिरी : वाटद येथे हातभट्टीची बेकायदा दारु विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद येथे बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार ३१ जानेवारी रोजी दुपारी १.४५ वा. सुमारास करण्यात आली. नितीन दत्ताराम झगडे (४२, रा. वाटद, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉस्टेबल कुलदिप दाभाडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी संशयित हा वाटद येथील जंगलमय भागात आपल्या ताब्यात ५४० रुपयांची ५ लिटर गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशिरपणे विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 03/Feb/2025

Shanti 4