गावखडी-भंडारवाडी येथे बेकायदेशीर मटका जुगार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी-भंडारवाडी येथे बेकायदेशिरपणे मटका जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार ३१ जानेवारी रोजी दुपारी ३.५० वा. सुमारास करण्यात आली. सुजन राजाराम भोसले (४०, रा. भंडारवाडी गावखडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तो घराच्या बाजूला मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगार खेळ बेकायदेशिरपणे खेळवत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 03/Feb/2025