गुहागर : पांगारी हवेली-भुरकुंडा रस्ता कामाचे भूमिपूजन

गुहागर : तालुक्यातील पांगारी हवेली-भुरकुंडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्या हस्ते झाले. जिल्हा वार्षिक योजना सन २०२४/२५ या योजनेतून हे काम मंजूर झाले असून भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे व भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्या प्रयत्नाने यासाठी निधी प्राप्त झाला आहे. अनेक वर्षे या रस्त्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत होती. अखेर हे काम मार्गी लागले आहे. यासाठी भाजप अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष आसिफ दळवी यांचेदेखील योगदान लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 03/Feb/2025

Merchant navy