लांजा : एसटीची दरवाढ तत्काळ रद करावी, अशी मागणी लांजा तालुका एसटी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना एसटीचा आधार आहे मात्र नुकतीच झालेली भाडेवाढ सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक आणि अवास्तव आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. या गोष्टींचा विचार करून ही दरवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना लांजा तालुका एसटी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे, कार्याध्यक्ष दत्तात्रय कदम, सुरेश करंबेळे, नितीन शेट्ये आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 03/Feb/2025














