मुलींनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक : डॉ. तौफिक शेख

मंडणगड : मुलींनी भावी जीवनात अनियमित मासिक पाळी, शरिरात हिमोग्लोबीनची कमतरता या समस्या निर्माण होऊ नयेत, म्हणून सकस आहार, व्यायाम व आवश्यक असेल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. तौफिक शेख यांनी केले.

येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, महिला विकास कक्ष, विशाखा समिती यांच्या वतीने व तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड यांच्या सहकायनि नुकतेच हिमोग्लोबीन तपासणी शिबीर व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नारगोलीचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तौफिक शेख उपस्थित होते. डॉ. संगीता घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लॅब तंत्रज्ञ आशीष कीर, संजना सारंग, सोनाली श्रावणपाटील आशा आरोग्यसेविका श्रीशा सापटे, मंदाकिनी जाधव, भूमिका पोस्टूरे, विजय उनाळे यांनी मुलींची मोफत हिमोग्लोबिन तपासणी केली.

यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थितांचे आभार विशाखा कक्षाच्या समन्वयक डॉ. संगीता घाडगे यांनी मानले.

Tata nexon

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 03/Feb/2025