रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये नवीन कायदे विषयक कार्यशाळा

रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी नवीन कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात भारतीय संसदेने पारित केलेल्या तीन नवीन कायद्यांविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेच्या उ‌द्घाटनाप्रसंगी पोलिस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके यांनी नवीन कायदेविषयक जाणीव जागृतीची गरज स्पष्ट केली. सरकारी अभियोक्ता मेघना नलावडे यांनी कार्यशाळेच्या प्रथम सत्रात भारतीय न्याय संहिता २०२३ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ बाबत मार्गदर्शन केले.

श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांनी भारतीय साक्ष अधिनियम २०२३ याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य डॉ. संजय कुलकर्णी, सहायक पोलिस उपनिरीक्षक अपूर्वा बापट, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र भाटकर आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल सिया घाग उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 03/Feb/2025