रत्नागिरी : जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांची कृती आराखड्याप्रमाणे प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकरता १०० दिवसाचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. १०० ग्रामपंचायतीमधील सर्व शासकीय हार्वेस्टिंग स्ट्रक्चर उभारण्यात यावे. १०० टक्के ग्रामपंचायतीमध्ये क्यू आर कोडच्या माध्यमातून डिजिटल कर वसुली सुरु करावी. ग्रामपंचायत कराची वसुली करावी. ग्रामपंचायत पाणीपट्टी सार्वजनिक व विशेष वसुलीवर भर द्यावा. पंधरावा वित्त आयोगातील ग्रामपंचायत स्तरावरील शिल्लक निधी खर्च करावा. सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय इमारतीतील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून वापरायोग्य करावेत. ग्रामपंचायत विकास आराखडा ई-ग्राम स्वराज पोर्टलवर अपलोड करावा, नरेगामधून १०० टक्के ग्रामपंचायतीमध्ये जलसंवर्धनासाठी कामे करण्यात येणार आहेत. उंबरठा ते मोहीम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत दाखले पुरवणे. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत सेवा पुरवणे, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचऱ्याचे वर्गीकरण करणे, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
कार्यवाहीसाठी शंभर दिवसांची मुदत
पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रा. पं. अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यात यावी. १०० दिवसांमध्ये कार्यवाही पूर्ण होईल यासाठी ग्रामपंचायतनिहाय नियोजन करावे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना भेटी देताना तालुक्यातील प्रत्येक ग्रा. पं. ला किमान एका क्षेत्रीय अधिकाऱ्याने भेट देणे आवश्यक आहे. त्यानुसार भेटीचे नियोजन करावे, अशा सूचना ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 04/Feb/2025














