रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सेवा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रमासह महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) सुरू केली. या वैद्यकीय सेवेने जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षभरात जिल्ह्यातील २५ हजार ६३४ आपत्कालीन रुग्णांना सेवा दिली असून, रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरली आहे.
जिल्ह्यातील रुग्णवाहिकांवर कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिकाचालक यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या या अविरत सेवेबद्दल पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी कौतुक केले आहे. गंभीर परिस्थितीत रुग्णांपर्यंत जलद पोहोचण्यासाठी शहरी भाग, दुर्गम आणि आदिवासी भाग आणि महामार्ग यांचा समावेश करून १०८ रुग्णवाहिका ही सेवा २४ तास दिली जाते. गरजूंना तत्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी वचनबद्ध आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सध्या १७रुग्णवाहिका अहोरात्र सेवा देत आहेत.
जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण भागांचा विचार करता रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी वर्षात सर्वाधिक २१ हजार ३१० कॉल वैद्यकीय कारणासाठी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात १७ रुग्णवाहिका आहेत. त्यांची सेवा अहोरात्र सुरू ठेवण्यासाठी डॉक्टर, चालक, मेकॅनिक, इतर स्टाफ मिळून ८५ जणांची टीम वादळवारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता दिवसरात्र झगडत असते- विशाल पवार, जिल्हा व्यवस्थापक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 05/Feb/2025














