खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त हुकल्याने साऱ्यांचाच हिरमोड झाला आहे. दुसऱ्या बोगद्यात १० पंखे बसवण्यात येणार आहेत. यातील ४ पंखे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंखे बसवण्याच्या कामासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ही कामे झाल्यानंतर ‘ट्रायल’ घेतली जाणार आहे. त्यानंतरच दुसन्या बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होईल, असे राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून सांगण्यात आले.
कशेडीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक खुली झाल्यानंतर वाहनचालकांचा प्रवास सुस्साट अन आरामदायी झाला होता. सर्वच वाहनचालकांनी बोगद्यातूनच प्रवास करण्यास पसंती दिली.
पहिल्या बोगद्यापाठोपाठ दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला झालेला असतानाच अडथळ्यांचे ‘ग्रहण’ सुरु झाले. दुसऱ्या बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा घेण्यासाठी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याची सबब राष्ट्रीय महामार्ग खात्याने पुढे केली.
सद्यस्थितीत एकाच बोगद्यातील दोन्ही बाजुकडील वाहतूक सुरू आहे. दुसऱ्या बोगद्यातील पंखे बसवण्यासह अन्य प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर दुसऱ्या बोगद्यातूनही पूर्ण क्षमतेने वाहतूक खुली होईल, अशी ‘डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, ही डेडलाईनही हुकली आहे सद्यस्थितीत ४ ठिकाणी पर बसवण्याचे काम वेगाने सुरू आ अन्य ६ ठिकाणी पंखे बसवण्यासा १५ दिवसांचा कालावधी लागण्या शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:48 PM 06/Feb/2025














