गद्दार म्हटलेल्या शिवसेनेत राजन साळवी जाणार नाहीत : विलास चाळके

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीनंतर राजन साळवी यांनी पराभवाचे खापर आमच्यावर फोडले. भाजपमध्ये प्रवेश करणार म्हणता म्हणता आता साळवी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. त्यांचा हा प्रवेश मात्र विचार करायला लावणारा आहे. स्वतःला निष्ठावंत म्हणारे, एकनिष्ठ असणारे राजन साळवी यांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी निमित्तच हवे होते. आता पाहू ते कुठे प्रवेश करतातय; परंतु ने ज्यांना गद्दार बोलले त्या शिवसेनेत राजन साळवी जातील, असे मला वाटत नाही. बहुदा ते उबाठा शिवसेनेतच राहतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिली.

स्वतःला निष्ठावंत म्हणणारे, एकनिष्ठ असणारे राजन साळवी यांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी निमित्तच हवे होते. काही पत्रकारांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी प्रतिक्रिया देताना उबाठाचे माजी आमदार राजन साळवी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय स्थैर्य मिळवण्यासाठी धडपडताना दिसत असल्याचे सांगितले.

जिल्हाप्रमुख चाळके म्हणाले, विधानसभेचा निकाल २३ तारखेला लागला आणि साळवी यांनी पराभवाचे खापर आमच्यावर फोडले. त्यानंतर २५ तारखेपासूनच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 11-02-2025