कीर्तनसंध्या परिवारातर्फे मंत्री नीतेश राणे यांचा सत्कार

रत्नागिरी : मंत्री नीतेश नारायण राणे करीत असलेले कार्य हिंदुत्वाला मोठे बळ देणारे आहे. आजच्या काळात हिंदूंना वाटणारी असुरक्षितता दूर करण्यासाठी अशा धाडसी नेतृत्वाची आणि कायद्याची अंमलबजावणी बिनधास्तपणे करणाऱ्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे.

म्हणूनच त्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या समूहातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी कीर्तनसंध्येचे उमेश आंबर्डेकर, अवधूत जोशी, मकरंद करंदीकर, गुरुप्रसाद जोशी, महेंद्र दांडेकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 12-02-2025