खेड : दापोली रोडवर नारंगी नदीच्या पात्राजवळ असलेल्या विटाच्या खाणीजवळ दि. १५ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अमोल बाबू चव्हाण (वय २५) असे अपघातातील मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल बाबू चव्हाण आणि विनोद बाबू चव्हाण (२४) हे दोघे होंडा कंपनीच्या काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून (क्र. के. ए. २८ इ.पी ८४४९) खेडहून दापोलीच्या दिशेने जात होते. रात्री १९.०५ वा. च्या सुमारास नारंगी नदीच्या पात्राजवळ असलेल्या विटाच्या खाणीजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत अमोल चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर विनोद चव्हाण यांच्या उजव्या गुडघ्याला, पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 18/Feb/2025














