रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने मराठी राजभाषा दिन आणि नुकताच मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा याचे औचित्य साधून जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इ. पाचवी ते दहावी शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे विजेते निवडण्यात येतील. स्पर्धकांनी माहितीसाठी अरुण मोर्ये (९१७५५२६६६०), अमेय धोपटकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 18/Feb/2025












