चिपळूण : कुंभार्ली घाटातील अपघातांमुळे वाहतूक कोंडी

चिपळूण : कुंभार्ली घाटातील रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असली तरीही घाटातील अपघाताची मालिका अजून संपलेली नाही. घाटात मालवाहू ट्रक बंद पडणे, चारचाकी वाहनांचे अपघात हे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे घाटात वारंवार वाहतूक कोंडीही होत आहे. सोमवारी एका अवघड वळणावर ट्रकला अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यासाठी चोवीस तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

कुंभार्ली घाटातील अपघातामधील ट्रक काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. ती रस्त्यावर उभी केल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत होता. कुंभालों घाट पावसाळ्यात पूर्णपणे खराब झाला होता. घाटात जागोजागी मोठे खट्टे पडल्यामुळे त्या खकुहुचात वाहने आदळून बंद पडत होती. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत होता. पावसाळ्यानंतर काही दिवसांनी पाटातील खडे बुजविण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती; मात्र घाटात अपघाताचे प्रकार सुरूच आहेत. सोमवारी संध्याकाळी पावणेसहा वाजता चिपळूणहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. हा ट्रक कापसाला दिघेवाडी येथील अमित दिलीप कांबळे यांच्या मालकीचा आहे. मुरादपूर-कुंभारवाडी येथील सचिन सुरेश शिरकर हा चिपळूण ते पुणे ट्रक चालवत असताना कुंभार्ली घाटात आल्यानंतर त्याच्या ट्रकला अपघात झाला.

यामध्ये ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली असून, ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात झाल्यानंतर काही काळ घाटातील वाहतूक चालली होती. शिरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर ट्रक काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. ही क्रेन रस्त्यावरच उभी करण्यात आली होती. त्यामुळे ये वाहतुकीमध्ये अडथळा येत होता. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत ट्रक रस्त्यावरून हटविण्यात आला नाही. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. मंगळवारी सकाळी ट्रक हटविण्यास सुरुवात झाली तेव्हा वाहनांची रांग व लागली होती. घटनास्थळावरून पोलिस वाहतुकीचे नियोजन करत होते. त्यामुळे वाहनचालकांना फार काळ कोंडीत अडकावे लागले नाही.

कुंभार्ली घाटाची दुरुस्ती झाली आहे. त्यामुळे रस्ता मोकळा आहे. त्याचा फायदा घेऊन वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या मार्गावरून अवजड मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्याचबरोबर खासगी वाहनेही चालतात. त्याचा विचार करून सर्वांनी वाहन चालवते पाहिजे, अपघात होणार नाही, याची काळजी प्रथम वाहनचालकांनी घेतली पाहिजे मंगेश वाजे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 19/Feb/2025